Blog Details

केअर संस्थेचा रौप्य महोत्सव

Posted on - 2025-06-09

लाल, भगवा, हिरवा वा तत्सम कोणताच रंग नसलेली ही संस्था “केअर”! MSW झाल्यानंतर सामाजिक कामाचे शास्त्रीय शिक्षण देण्यासाठी श्रीनिवास सावंत, शरद सावंत, डॅा.दिनू मॅथ्यू, राम अडसुळे यांनी २५ वर्षांपूर्वी ही संस्था सुरू केली आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नसतांना स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून ती २५ वर्ष चालवली. या २५ वर्षात अनेक झोपडपट्ट्यामध्ये, ग्रामीण भागात सामाजिक काम कसे करायचे याचे सहा महिन्यांचे कोर्सेस चालवले आणि सामांन्यातले असामान्य असे ४००० सामाजिक कार्यकर्ते घडवले. या कोर्सेसमधून सामाजिक कामाचे प्रशिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामाजिक संस्था सुरू केल्या आहेत आणि विविध विषयांमघ्ये ते काम करत आहेत. सामाजिक काम कसे करायचे याचे शिक्षण घेतले. कामाला सुरु वात केली आणि मग त्याचे रूपांतर संस्थेत झाले. आरोग्य, अनाथ मुले, रस्त्यावर राहणारी माणसं अशा विविध समाजघटकांसाठी काम करणाऱ्या ५० हून अधिक संस्था आज कार्यरत आहेत. त्या सर्वांचे अनुभव कथन ऐकताना मी भारावून गेलो. कार्यक्रमाची सुरुवात एका रोपट्याला पाणी देऊन केली गेली आणि प्रमुख पाहूणे म्हणून केअर संस्थेच्या पहिल्या बॅचचे दोन विद्यार्थी श्री ख्रिस्थोपर रॉड्र्रिग्ज व श्री बलभीम कुलकर्णी हे होते. या युनिक कामासाठी “केअर” चे अभिनंदन ! -राजेश कापसे

Leave a Comment